भारतातून होणाऱ्या ताज्या फळांच्या आणि दुग्धजन्य फळांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षापासून लक्षणीय वाढ झालेली आहे. भारतातून पेरू, द्राक्षे, आंबे, सुपारीची पाने, दही, पनीर यांच्या निर्यातीत प्रचंड वाढ झालेली आहे.
गेल्या काही वर्षात भारतातून होणाऱ्या ताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. भारतातून होणाऱ्या पेरूच्या निर्यातीत 2013 पासून 260% वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते जानेवारी 2013-14 मध्ये 0.58 दशलक्ष तर 2021-22 मध्ये 2.09 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीचे पेरू निर्यात करण्यात आले आहेत.
( हेही वाचा : दम्यावर मात करत तिने पार केला समुद्र! ९ वर्षीय चिमुकलीचा नवा विक्रम… )
संपूर्ण ताज्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीत द्राक्षांची सर्वाधिक निर्यात झाली आहे. वर्ष 2020-21 मध्ये, 314 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीच्या ताज्या द्राक्षांची निर्यात करण्यात आली. 36 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे आंबे, 19 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची सुपारीची पाने आणि इतर फळे निर्यात करण्यात आली. भारताच्या ताज्या फळांच्या एकूण निर्यातीत ताजी द्राक्षे आणि इतर ताज्या फळांचा वाटा 92% आहे. निर्यात करण्यात आलेल्या ताज्या फळांपैकी 82% फळे प्रमुख 10 देशांना निर्यात करण्यात आली आहेत.
भारतातून 2020-21 मध्ये निर्यात केलेली ताजी फळे
- बांगलादेश (126.6 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- नेदरलँड्स (117.56 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- संयुक्त अरब अमिरात(100.68 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- युके (44.37 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- सौदी अरेबिया (24.79 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- ओमान (22.31 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- कतार (16.58 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
दही (योगर्ट) आणि पनीर (इंडियन कॉटेज चीज) यांच्या निर्यातीत देखील 200 टक्क्यांनी वाढ झाली असून एप्रिल ते जानेवारी 2013-14 मध्ये या वस्तूंची निर्यात 1 कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी होती त्यात वाढ होऊन या वस्तूंची 2021-22 मध्ये 3 कोटी अमेरिकी डॉलर्सची निर्यात झाली. दुग्धजन्य वस्तूंच्या निर्यातीत गेली पाच वर्षे 10.5% चक्रवाढ दराने वार्षिक वाढ झालेली दिसून येत आहे. दुग्धजन्य पदार्थांपैकी 61% हून अधिक पदार्थ प्रमुख 10 देशांना निर्यात करण्यात आले.
भारतातून 2020-21 मध्ये निर्यात केलेले दुग्धजन्य पदार्थ
- संयुक्त अरब अमिरात(39.34 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- बांगलादेश (24.13 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- अमेरिका (22.8 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- भूतान (22.52 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- सिंगापूर (15.27 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- सौदी अरेबिया (11.47 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- मलेशिया (8.67 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- कतार (8.49 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- ओमान (7.46 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)
- इंडोनेशिया (1.06 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स)