काही माकडांचा कळप हा शाळेच्या सभोवतालच्या परीसरात काही दिवसांपासून फिरत आहे आणि त्यातील काही माकडांनी शाळेतील मुलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुम्मापट्टी येथून वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन अॅन्ड रेस्क्यू असोसिएशन(W.A.P.R.A)संस्थेला माकडांसंदर्भात तक्रार देण्यात आली होती. ही माहिती मिळताच वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन अॅण्ड रेस्क्यू असोसिएशन संस्थेने घटनास्थळी धाव घेत माकडांना पकडून शाळकरी मुलांना दिलासा दिला आहे.
पत्र लिहून दिली तक्रार
शाळेतील मुलांना त्रास देणा-या माकडांना पकडून नेण्यासाठी संबंधित शाळेतून फोन जाताच, वनविभागाने घटनास्थळी जात शाळेतील मुलांवर होणा-या वन्य माकडांच्या हल्ल्यापासून त्यांचे संरक्षण केले आहे. त्यावर वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन अॅन्ड रेस्क्यू असोसिएशन संस्थेने सदर जागेवरील हद्दीत असणा-या वन परीक्षेत्र अधिकारी माथेरान यांना लेखी पत्र पाठवून रायगड जिल्हा परिसर प्राथमिक शाळा जुम्मापट्टी येथे काही उपद्रवी माकडांच्या कळपाने शाळेतील मुलांना गंभीररित्या जखमी असल्याचे सांगितले.
करण्यात आला सत्कार
वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन अॅन्ड रेस्क्यू असोसिएशन (W.A.P.R.A)संस्थेने त्या तक्रारीची दखल घेऊन, सोमवारी २८ फेब्रुवारीला त्या परिसरात फिरत असलेल्या उपद्रवी माकडांना पकडून त्या शाळेतील मुलांवर होत असलेल्या वन्य माकडांच्या हल्यापासून बचाव केल्याबद्दल संस्थेच्या शाळेतील मुख्याध्यापिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
( हेही वाचा: युक्रेनमधून सुटका होण्यासाठी पाकड्यांनी घेतला तिरंगा! का सुरु झाला #indianstudentsinukraine ट्रेंड? )
माकडांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले
त्यावेळी घटनास्थळावर सदर हद्दीचे आर. एफ. ओ. उमेंश जगंम, राउंड ऑफिसर सुहास हेराजी मात्रै, भूषण साळुंखे, कुमार म्हसकर, मंकी क्यॅचर हकीम शेख, सर्पमित्र अतुल काबंळे,सह जोडीदार गणेश बालू हरीजन,आदी उपस्थीत होते, तरी सदर माकड फीट असल्याचे वैद्यकीय पञ घेऊन, वन विभागाच्या गाईडलाईन्सप्रमाणे त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
Join Our WhatsApp Community