भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण सोमवारी उपवास ठेवतात. भगवान शंकराला बेलाची पानेही अतिशय प्रिय आहेत. महाशिवरात्रीला बेलाच्या पानाला विशेष महत्त्व असते. पण भगवान शिवशंकराला बेलाची पाने अर्पण करण्याचे काय नियम आहेत ? बेलाची पाने का अर्पण केली जातात आणि बेलाची पाने अर्पण करताना भक्तांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? याविषयी जाणून घेऊया. शंकराला बेल वाहताना ते कमीतकमी तीन पानांचे असलेच पाहिजे. जेव्हा ती ३ पाने एकत्र असतात तेव्हा ते बेलाचे संपूर्ण एक पान म्हणून मानले जाते.
( हेही वाचा : दम्यावर मात करत तिने पार केला समुद्र! ९ वर्षीय चिमुकलीचा नवा विक्रम… )
बेलाचे पान वाहताना या गोष्टींची काळजी घ्या
- बेलाची पाने चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या तिथींना किंवा संक्रांतीच्या वेळी आणि सोमवारी तोडू नयेत.
- महाशिवरात्रीला पूजेसाठी झाडावरून बेलाचे पान तोडतांना ते मध्ये फाटणार नाही याची काळजी घ्या.
- शास्त्रानुसार, तुमच्याकडे जास्तीचे बेलाचे पान नसेल तर तेच बेलपत्र तुम्ही पाण्याने धुऊन पुन्हा पुन्हा अर्पण करू शकता.
- शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याशिवाय कधीही बेलपत्र वाहू नका.
- बेलपत्र नेहमी उलटे करून महादेवाला अर्पण करावे, म्हणजेच पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वर असावा.
बेलपत्रामध्ये चक्र व वज्र असलेली पाने भगवान शंकराला वाहू नये. - असे म्हणतात भगवान शंकराने स्वत: भक्तांना आशीर्वचन दिले आहे की, ‘जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील, त्यांच्यावर माझी कृपादृष्टी होईल.