संभाजीराजेंनी उपोषण सोडले! मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या मान्य

यावेळी त्यांनी राज्य सरकारचे आभार देखील मानले आहेत.

140

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी गेले दोन दिवस खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू होते. अखेर सरकारने मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मागण्या मान्य केल्यामुळे संभाजीराजे यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारचे आभार देखील मानले आहेत.

उपोषण सोडले

खासदार संभाजी राजे यांचं गेले दोन दिवस चालू असलेलं उपोषण त्यांनी मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत होते. जोपर्यंत आपल्याला सरकार कडून लेखी आश्वासन देण्यात येत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. अखेर सरकारने त्यांची ही मागणी मान्य करत लेखी आश्वासन दिल्याने संभाजीराजे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

(हेही वाचाः ‘आता खेळ सुरू झाला आहे!’ राऊतांनी पंतप्रधानांना पत्र पाठवत केला ‘गौप्यस्फोट’)

सरकारचे मानले आभार

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर जात संभाजीराजे यांची भेट घेतली. त्यानंतर लहान मुलाच्या हातून सरबत घेत संभाजीराजे यांनी आपले उपोषण मागे घेतले. सरकारने मागण्या मान्य करणार असल्याचे लेखी आश्वासन आपल्याला दिले आहे. त्यामुळए मी पुन्हा एकदा सरकारचे आभार व्यक्त करतो असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

या मागण्या मान्य

  1. मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार.
  2. सार्थीचं व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत त्याची पूर्तता करणार.
  3. सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.
  4. सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.
  5. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार.
  6. व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत.

(हेही वाचाः दक्षिण मुंबईचा विकास की विनाश? संतप्त व्यापारी संघटनांची दक्षिण मुंबईत बैठक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.