चंद्रपूरातील महाविद्युत औष्णिक केंद्रातील बिबट्यासह अस्वलही होणार जेरबंद?

114

चंद्रपूर येथील महाविद्युत औष्णिक केंद्रात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात दोन माणसांचा जीव गेल्यानंतर वनविभागाने तातडीने वाघाल जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच आता उरलेले वाघ, बिबट्या आणि अस्वलही जेरबंद करण्याच्या तयारीत वनविभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

महाविद्युत औष्णिक केंद्रात वनविभागाकडून गस्त

फेब्रुवारी महिन्यात १७ आणि १८ या सलग दोन दिवशी वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात दोन माणसांचा जीव गेला. या घटनेनंतर वाघ जेरबंद करुन आठवडा उलटला तरीही वनविभागाची टीम चंद्रपूरातील महाविद्युत औष्णिक केंद्रात गस्त घालत आहे. गेल्या आठवड्यात अस्वलही या भागांत दिसून आले. त्यामुळे घाबरलेल्या स्थानिक नागरिकांनी या वन्यप्राण्यांना जेरंबद केल्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा –प्रभादेवीत ८५ लाखांची सदनिका! ‘या’ लोकांसाठीच होणार उभारणी)

बिबट्यासह अस्वलही होणार जेरबंद?

या मागणीबाबत वनविभागाने सकारात्मक विचार केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. उरलेले तीन वाघ आणि बिबट्याला प्राधान्याने जेरबंद केले जावे, यासाठी चंद्रपूर वनविभाग (प्रादेशिक)ने वनविभागाच्या प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांना पत्र दिले आहे. यातील तीन वाघांना जेरबंद करण्याची मागणी अगोदरच मंजूर झाली आहे. तर बिबट्यालाही जेरंबद करण्याची परवागनी लवकरच वरिष्ठ पातळीवर मंजूर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र अस्वलालाही पकडण्याची मागणी सतत स्थानिकांकडून सुरु असल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली.

(हेही वाचा – माणसाचं मुंडकं उडवणारा ‘तो’ वाघ पकडला!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.