फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे उद्भवलेल्या कोरोनाच्या तिस-या लाटेचा जवळपास अंत झाला आहे. सोमवारी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यभरात केवळ ४०७ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्क्यांवर नोंदवले गेले.
आज ९६७ रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात आता केवळ १ लाख ३२ हजार ८८६ माणसे घरी विलगीकरणात आहेत. ही संख्या येत्या दोन दिवसांत लाखापर्यंत खाली उतरेल, असा अंदाज आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केला. आज ९६७ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. गेल्या काही दिवसांपासून पहिल्यांदाच एवढ्या कमी संख्येने रुग्ण डिस्चार्ज झाल्याची सोमवारची नोंद होती. तर ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
(हेही वाचा – स्वातंत्र्यकवी गोविंद यांच्या कवितांचे पुस्तक प्रकाशित! भगूर येथे सोहळा संपन्न)
राज्यातील कोरोनाची स्थिती
- राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या – ६ हजार ६६३
- राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के
- राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची रुग्णांची – ७८ लाख ६५ हजार ७०५