मध्य रेल्वेने असे कमावले कोट्यवधी रुपये!

164

भंगारमुक्त होण्यासाठी मध्य रेल्वे अनोखा उपक्रम राबवत आहे. “झिरो स्क्रॅप मिशन” या योजनेद्वारे मध्य रेल्वेला तब्बल ४४३.३५ कोटीचा फायदा झाला आहे. मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड, भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने “झिरो स्क्रॅप मिशन” सुरू केले आहे. या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, वापर करण्यास अयोग्य असलेले डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे.

( हेही वाचा : प्रति लिटर 2 रुपयांनी ‘या’ कंपनीचे दूध महागणार )

रेल्वेच्या उत्पन्नात ३१.६५ टक्क्यांनी वाढ

मध्य रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात फेब्रुवारी-२०२२ पर्यंत भंगारातून ४४३.३५ कोटी प्राप्त केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी या उत्पन्नात तब्बल १०६.५७ कोटी आणि ३१.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेला भंगार साहित्यातून ३३६.७८ कोटी प्राप्त झाले होते. भंगाराच्या विक्रीमुळे केवळ महसूल मिळत नाही तर परिसराची चांगली देखभालही होत आहे. असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले. रेल्वेमधील विविध ठिकाणी शोधण्यात आलेल्या सर्व भंगार साहित्याची मध्य रेल्वे झिरो स्क्रॅप मिशनमध्ये विक्री करेल. “झिरो स्क्रॅप मिशन” चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभाग आणि विविध डेपोंमध्ये भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे. असेही लाहोटी यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.