महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी जिल्हाधिका-याच्या ‘त्या’ कृत्यावर उच्च न्यायालयाने फटकारले!

130

आपल्या पदाचा गैरवापर करणा-या असंख्य घटना आपण ऐकल्या वा अनुभवल्या असतीलच. असाच एक प्रकार कोल्हापुरातून समोर आला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी एका शेतक-याचे सोयाबीन पीक जेसीबीने नष्ट केले आहे. महाशिवरात्र साजरी करण्यासाठी अधिका-यांनी  शेतक-याच्या कष्टावर पाणी फेरल्याने संतप्त झालेल्या शेतक-याने या तक्रारीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने 1 मार्चला (महाशिवरात्री) या संबंधित जागेचा कोणताही भाग उत्सवासाठी वापरण्यास मनाई करणारा आदेश दिला आहे.

उत्सव होता कामा नये

न्यायमूर्ती शाहरुख जे काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद एन जाधव यांच्या खंडपीठाने 26 फेब्रुवारी रोजी शशिकला सुरेंद्र अंबाडे आणि इतरांनी अधिवक्ता धैर्यशील सुतार आणि निर्मल पगारिया यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवर संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा केला जाऊ नये, असा आदेश देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी महाशिवरात्रीचा उत्सव मैदानाला लागून असणा-या रस्त्यावर केला जाईल, अशी हमी दिल्यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी 10 मार्च रोजी ठेवली आहे.

( हेही वाचा: मुंबई पोलीस दलात खांदेपालट! हेमंत नगराळेंची आयुक्तपदावरुन बदली अन्…)

चक्क 7/12 घेतला ताब्यात

महाशिवरात्र साजरी करण्यासाठी या संबंधित याचिकाकर्त्या शेतक-याच्या शेतातील सोयाबीन पीक जेसीबीच्या साहाय्याने कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांकडून नष्ट करण्यात आले. सुनावणी दरम्यान कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि केएमसीचे मुख्य अधिकारी निखिल जाधव यांनी याचिकाकर्त्याच्या घरातील एका सदस्याने पीक नष्ट करण्यास संमती दिल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूरच्या अधिका-यांनी तर संबंधित जागा 15 दिवसांकरता आपल्या हाती घेण्यासाठी शेतक-याच्या जमीनीचा 7/12 चा उतारा आपल्या ताब्यात घेतला होता. न्यायालयाने यावर जिल्हाधिका-यांना खडे बोल सुनावले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.