राज्यात शिक्षणाधिकार अंतर्गत 25 टक्के आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यासंदर्भातील प्रवेशाची अर्ज प्रक्रिया राज्यात सुरु आहे. पण हे अर्ज करताना विविध प्रवेश स्तरावरील वयोमर्यादेबाबत पालकांना संभ्रम आहे. त्यामुळे सरकारने 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरता आरटीई (right to education) प्रवेशाच्या वयोमर्यादेची निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली आहे.
मूदतवाढ देण्यात आली
जुलै ते नोव्हेंबर दरम्यान, जन्मलेल्या मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेकदा नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि पहिली या वेळी प्रवेश घेताना, मुलांची वयोमर्यादा किती असावी, यावर पालकांना संभ्रम असल्याने सरकारने प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक संचालनालयाकडून सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांना या सूचनांचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, अधिकाधिक पालकांनी या अंतर्गत प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
( हेही वाचा: महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी जिल्हाधिका-याच्या ‘त्या’ कृत्यावर उच्च न्यायालयाने फटकारले! )
इतक्या जागा उपलब्ध
राज्यात 9 हजार 84 शाळांमध्ये आरटीईच्या 1 लाख 9 हजार 942 जागा उपलब्ध आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत या जागांसाठी 1 लाख 80 हजरांहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Join Our WhatsApp Community