दिल्ली दंगल प्रकरणी गांधी कुटुंबियांना उच्च न्यायालयाची नोटीस

95

दिल्ली दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने अनेक मोठ्या राजकीय नेत्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर पक्षकार म्हणून कारवाई का करू नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांचा समावेश आहे. यासोबतच न्यायालयाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजप नेते कपिल मिश्रा, भाजप खासदार परवेश वर्मा यांनाही अशीच नोटीस पाठवली आहे. यावर न्यायालयाने येत्या 4 मार्चपर्यंत सर्वांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

755 एफआयआर दाखल करण्यात आले

दिल्ली दंगल भडकवण्यात नेत्यांची कथित भूमिका असून या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत तेच लोक या प्रकरणात पक्षकार आहेत का? त्याचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना अटक करण्याच्या तुमच्या याचिकेवर आम्ही पुढे जाऊ शकतो का?, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले होते. ईशान्य दिल्लीतील दंगलीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ईशान्य दिल्लीत 2020 मध्ये 23 ते 26 फेब्रुवारीदरम्यान दंगली झाल्या होत्या. यामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला. या दंगलीत 581 जण जखमी झाले होते. ईशान्य दिल्लीत दंगलखोरांनी 24 आणि 25 फेब्रुवारीला गोंधळ घातला. या दंगलीप्रकरणी एकूण 755 एफआयआर दाखल करण्यात आले असून यातील काही प्रकरणांची सुनावणी उच्च न्यायालय आणि दिल्लीच्या कडकड डुम्मान्यायालयात सुरू आहे. काही आरोपींना कोर्टातून जामीनही मिळाला आहे.

(हेही वाचा तुम्ही पाल्याचा आरटीईमधून प्रवेश घेताय, तर ही बातमी वाचाच…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.