रशिया-युक्रेन युद्धाची भारताला ‘अशी’ पोहचते झळ!

165

रशिया- युक्रेन युद्धाचा फटका गॅस पुरवठ्याला बसला आहे. त्यामुळे मंगळवारपासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ

गेल्या 6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर आहेत. मात्र या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 102 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाली आहे. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 170 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1 हजार 736 रुपये होती. नोव्हेंबरमध्ये ते 2 हजार आणि डिसेंबरमध्ये 2 हजार 101 रुपये झाले.

( हेही वाचा: विलीनीकरणासाठी आता एसटी कर्मचारी मंत्र्यांच्या दारी! )

घरगुती सिलिंडरच्या किमती वाढणार

यानंतर, जानेवारीमध्ये व्यवसायिक सिलिंडरचे दर कमी झाले आणि फेब्रुवारी 2022 ला या सिलिंडरचे दर पुन्हा स्वस्त झाले आणि 1 हजार 907 रुपयांवर आले. यावेळीही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर मंगळवारपासून दिल्लीत 1 हजार 907 रुपयांऐवजी 2 हजार 12 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात आता 1 हजार 987 ऐवजी 2 हजार 95 रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईत त्याची किंमत आता 1हजार 857 रुपयांवरून 1 हजार 963 रुपयांपर्यंत वाढली आहे. दरम्यान, येत्या 8 दिवसांत घरगुती वापराच्या सिलिंडरची दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.