‘या’ कारणास्तव 30 राईस मीलवर करण्यात आली कारवाई

135

खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला धान एमएसपी (minimum support price)अंतर्गत खरेदी केला गेला. 35 लाख 57 हजार 160 क्विंटल व आदिवासी विकास महामंडळामार्फत 8 लाख 53 हजार 857 अशी एकूण 44 लाख 11 हजार 17 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेले धान अनेक मीलमध्ये भरडाईसाठी देण्यात आले. पण, खरेदीला दिलेला हंगाम संपूनही 30 राईस मीलकडून धान्याची भरडाई न झाल्याने, या राईस मीलवर कारवाई करण्यात आली आहे.

अपेक्षित भरडाई केली नाही

धान भरडाई करून तांदूळ जमा करण्यास्तव शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2021 रोजी काढण्यात आला व दोन्ही अभिकर्ता संस्थांमार्फत भरडाईच्या अनुषंगाने करारनामे करण्यात आले. धान भरडाई समन्वय समिती जिल्हाधिकाऱ्यांचे अध्यक्षतेखाली असून, जिल्हा पणन अधिकारी व प्रादेशिक व्यवस्थापक, भंडारा हे सदस्य सचिव आहेत. धान भरडाई त्वरित होण्याच्या अनुषंगाने समिती दर पंधरा दिवसांनी आढावा घेते. खरेदी हंगाम संपूनही अपेक्षित गतीने गिरणी मालकांकडून धान भरडाई केली जात नसल्याचे निदर्शनास आले. भात गिरणीधारकांना वारंवार धान भरडाई करुन देण्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले, चर्चाही करण्यात आली.

( हेही वाचा :मलिकांची उच्च न्यायालयात धाव, कारण… )

परिणामी कारवाई करण्यात आली

दोन्ही अभिकर्ता संस्थांमार्फत धानाच्या उचलीकरता नियतन आदेशही देण्यात आले, काहींना बारदानादेखील पुरवण्यात आला, तरीही तांदूळ जमा करण्यात आला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून देखील त्याला प्रतिसाद दिला नाही. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पणन अधिकारी यांचे 15 मिलर्स व आदिवासी विकास महामंडळाकडील 15 मिलर्सवर अनामत रक्कम व बारदाना रक्कम वसूल करण्यास सांगितले. करारबध्द गिरणी मालक यांनी करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार धान भरडाई करुन तांदूळ जमा न केल्यास अशीच कारवाई करण्यात येईल. धानाची उचल करुन विहीत निकषात बसणारा तांदूळ स्विकृती केंद्रावर जमा करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.