काही दिवसांपूर्वी ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकराने तीव्र निषेध व्यक्त केला. तर दुसरीकडे भाजपाकडून देखील राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यासंदर्भात भाजपाकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधण्यात आला असून नवाब मलिकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेलारांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही खोचक सल्ला दिल्याची चर्चा आहे.
काय म्हणाले आशिष शेलार
केंद्रीय तपास यंत्रणांना दहशतवादविरोधातल्या लढाईमध्ये सहकार्य करावे. देव, देश आणि धर्मासाठी हे बोलायची नाही, उद्धवजी आता करण्याची वेळ आली आहे. उद्धवजी, दाऊद आणि त्यांच्या हस्तकांविरोधात तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या, असे शेलारांनी म्हटले आहे. यावेळी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणीही शेलारांनी लावून धरली. तसेच या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी दहशतवाद्यांविरोधात भूमिका घेतल्यास आम्ही त्यांचं स्वागत आणि समर्थनच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – रशियाने ‘हा’ टाकला बाॅम्ब ज्यामुळे हवेतील ऑक्सिजन झाला गायब!)
…तर ठाकरेंना शंभर टक्के पाठिंबा देऊ
उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आणि दहशतवादाविरोधातील लढाईसाठी पवारांच्या समोर झुकू नका. झुकेंगे नही हा नारा देऊन चालणार नाही. तसे वागावे. मुंबई पोलिसांना आदेश द्या, दाऊदचे गुंडे हस्तक आणि राजकीय हस्तकांवर एफआयआर दाखल करायला सांगा. अशा किती मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार दाऊद सोबत झाले त्याचा तपास व्हावा. उद्धवजी दहशतावाद्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्याल असा आमचा समज आहे आणि विश्वास आहे. तुम्ही अशी भूमिका घेतल्यास त्याला भाजप कोणतेही आढेवेढे न घेता, अट न टाकता, कोणतेही राजकीय भांडवल न करता तुम्हाला शंभर टक्के समर्थन देऊ. या कारवाईविरोधात तुमच्यासोबत उभं राहू. उद्धव ठाकरेंनी अधिवेशनात निवेदन ठेवावं, असेही पुढे शेलारांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community