‘ऑपरेशन गंगा’ साठी भारताने उतरवले ‘हे’ विमान

106

रशिया-युक्रेन यांच्या दरम्यान सुरु असलेल्या घनघोर युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तातडीने मायदेशात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. मात्र एअर इंडियाच्या विमानातून तितक्याशा संख्येने भारतीयाना घेऊन येता येत नाही, त्यामुळे अखेर भारताने वायू दलाची मदत घेतली आहे.

एकाच वेळी जिथे १०२ प्रवाशांना घेऊन येता येथे तिथे भारताने आता सी-१७ विमान या गंगा ऑपरेशनसाठी वापरले आहे, ज्यामुळे एकाच वेळी ३३६ भारतीयांना भारतात घेऊन येत येणार आहे. या विमानामुळे एकाच वेळी अधिक संख्येने प्रवाशी भारतात आणता येऊ शकतात. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बैठका घेत आहेत, त्यातच पंतप्रधान मोदी यांनी ‘ऑपरेशन गंगा’ साठी सी-१७ विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. हे विमान एकाच फेरीत १० हजार किलो मीटरपर्यंत प्रवास करू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.