रेल्वे बोर्डाने जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. रेल्वे बोर्डाने जनरल डब्यांवर घातलेले निर्बंध दूर केले आहेत. हे निर्बंध दूर करण्यात आल्याने प्रवाशांना आता मेल, एक्स्प्रेसच्या जनरल डब्यांतून जनरल म्हणजेच अनारक्षित तिकिटावर प्रवास करता येणार आहे.
प्रवाशांना करावी लागणार प्रतीक्षा
मात्र, अनारक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या जनरल डब्यांत देखील आरक्षित तिकिटावर प्रवास केला जात आहे. ज्या दिवशी डब्यांत आरक्षण नसेल तेव्हापासूनच अनारक्षित तिकिटावर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे जनरल डब्यांतून अनारक्षित तिकिटावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.
(हेही वाचा – Russia Ukraine War: खार्किव गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू)
ती मागणी अखेर मान्य
गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी जनरल डब्यांवर असलेले निर्बंध हटवून त्यातून जनरल तिकिटावर प्रवास करण्याची मंजुरी द्यावी, अशी मागणी सातत्याने करीत होते. ती मागणी अखेर मान्य झाली आहे. मात्र, त्यासाठी नो बुकिंग डेटसाठी अट टाकलेली आहे. नुकतेच रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर व डेमूसाठी जनरल तिकीट उपलब्ध करून दिले.
Join Our WhatsApp Community