भाजप नेते किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. मंगळवारी नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर सत्र न्यायालयाने निर्णय घेताला. यावेळी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज सत्र फेटाळून लावला आहे. त्यामुळे नील सोमय्यांना न्यायालयाने दणका दिला आहे.
राऊत म्हणाले, “बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे”
भाजप नेते किरीट सोमय्यांनी यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. जम्बो कोविड सेंटरची कंत्राट संजय राऊत यांच्या नजीकच्या व्यक्तींना देण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा करत आरोप केला होता. यानंतर संजय राऊत यांनी बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे असं म्हटलं होतं. यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
(हेही वाचा – “मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर… “, भाजपने दिला इशारा)
नील सोमय्यांना अटक होणार का?
भाजप नेते किरीट सोमय्या याचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश दीपक भागवत यांच्या समोर ही सुनावणी पूर्ण झाली. त्यांनी जामीन फेटाळत नील सोमय्या यांना पहिला दणका दिला आहे. त्यामुळे आता नील सोमय्यांना अटक होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
Join Our WhatsApp Community