महेश मांजरेकरांना हायकोर्टाकडून दिलासा, वाचा काय आहे प्रकरण

141

तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्यामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश माहिम पोलिसांना दिले आहेत.

मांजरेकरांना अटक होण्याची शक्यता

‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्याने मांजरेकर आणि अन्य सहकाऱ्यांविरोधात समाजातील काही घटकांकडून तीव्र विरोध आणि संतप्त प्रतिक्रिया निर्माण झाल्या होत्या. तसेच भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी अॅड्. प्रकाश साळसिंगकर यांच्यामार्फत विशेष पॉक्सो न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मांजरेकर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान मांजरेकर यांच्यावर भादंवि कलम २९२, ३४ तसेच पॉक्सो कलम १४ आणि माहिती तंत्रज्ञान कलम ६७ व ६७ ब अंतर्गत माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. तसेच मांजरेकर यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली.

(हेही वाचा – “मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर… “, भाजपने दिला इशारा)

सुनावणीत मांजरेकरांना दिलासा

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मांजरेकर यांनी गुन्हा रद्द व्हावा आणि अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना या आधीच्या सुनावणीमध्ये दिलासा देण्यास नकार दिला होता. मात्र आज झालेल्या सुनावणीत मांजरेकरांना दिलासा दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.