सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे, त्यामध्ये अमेरिकेचे सैन्य प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, याउलट अमेरिका युक्रेनला १ बिलियन डॉलर आर्थिक मदत करेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या संसदेसमोर भाषण करताना केली.
मागील ७ दिवस हे युद्ध सुरु आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अणू हल्ला करण्याचा विचार सुरु केला आहे, अशा वेळी सर्वांच्या नजरा अमेरिकेकडे लागल्या होत्या, बुधवारी, २ मार्च रोजी जो बायडेन यांनी भाषण केले आणि त्यांनी अमेरिका युद्धात उतरणार नाही, अशी घोषणा केली.
पुतिन हुकूमशहा!
६ दिवसांपूर्वी पुतीन यांनी मोठी चूक केली आहे, त्यांचा मनमानी आणि हुकूमशाही कदापि सहन केली जाणार नाही. आम्ही रशियावर कडक आर्थिक निर्बंध लावले आहे, तसेच अमेरिकेने रशियाच्या विमानांना अमेरिकेच्या अवकाशात प्रतिबंध लावला आहे. अजूनही प्रतिबंध आम्ही कडक करणार आहोत, असेही जो बायडेन म्हणाले.
(हेही वाचा रशियाने ‘हा’ टाकला बाॅम्ब ज्यामुळे हवेतील ऑक्सिजन झाला गायब!)
संघ शक्तीचा विजय
या सर्व परिस्थितीत युरोपियन देश आणि पश्चात्त देश संघटित राहिले, त्यांच्या एकजुटीमुळेच रशिया कमकुवत झाला. रशियाचा शेअर बाजार ४० टक्क्यांनी घसरला आहे. रशियाला या युद्धाचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर खरे तर असे पाऊल उचलणे चुकीचे होते, पण पुतिन यांनी ते उचलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असेही बायडेन म्हणाले.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचे कौतुक
या युद्धात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांनी जी हिमंत दाखवली, युक्रेनच्या जनतेने जो प्रतिकार केला याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्यांच्या मागे नाटो, अमेरिका आहि युरोपियन राष्ट्र खंबीरपणे उभे आहेत, असेही बायडेन म्हणाले.
Join Our WhatsApp Community