भारतवासियांचे रशियाला समर्थन! ट्विटर ट्रेन्ड होतोय #IStandWithPutin…

255

रशिया-युक्रेन युद्धाचे जगभरात पडसाद उमटत आहेत. जगातील सर्व देशांनी संयुक्त राष्ट्र संघात दोन्ही देशांच्या समर्थनार्थ तसेच निषेधार्थ मत नोंदवली. पण भारताने मात्र संयुक्त राष्ट्र संघाच्या दोन्ही बैठकांमध्ये तटस्थ भूमिका घेतली आहे. भारत सरकार जरी रशिया-युक्रेन युद्धात तटस्थ असला, तरी भारतीय मात्र रशियाला आपलं समर्थन देत आहेत. #IStandWithPutin असा ट्रेंड आता ट्विटरवर सुरु झाला आहे.

रशियाने आतापर्यंत भारताला संयुक्त राष्ट्र संघात अनेकदा साथ दिली आहे. रशिया कधी कधी भारताच्या मदतीला धावून आला ते ट्विटच्या माध्यमातून सन्नी राजपूत या नेटक-याने सांगितले आहे. या नेटक-याने विटो पावर वापरत रशियाने 1957 साली काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला दिलेला पाठिंबा नमूद केला आहे. तसेच 1961 साली गोवा मुक्तीच्या वेळीही रशियाने भारताला सहकार्य केल्याचे त्याने नमूद केले. रशियाने 1962 साली काश्मीरच्या मुद्यावर भारताला समर्थन दिले होते. 1971ला पुन्हा काश्मीरच्या मुद्यावरुन भारताला मदत केली होती. 2019 ला कलम 370 हटवल्यानंतरही रशियाने भारताचे समर्थन केल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हा माणूस रशियाच्या भविष्यासाठी लढत आहे. मी रशियासोबत आहे. असं म्हणत सुमित कुमार या नेटक-याने आय स्टॅंड विथ पुतिन म्हणत आपलं समर्थन दिलं आहे.

https://twitter.com/sumityadav727/status/1498861250649886721?s=20&t=3v2c80_uQ8zX0-6Hg5G1NA

पुतिन हे खूप धाडसी आणि हुशार माणूस आहे. रशियाच्या भविष्यासाठी हा लढा लढला जात असल्याने, मी पुतिन सोबत असल्याचे म्हणत या नेटक-याने रशियाने भारताला संयुक्त राष्ट्र संघात केलेली मदत आणि युक्रेनने भारताला केलेला विरोध दर्शवला आहे.

( हेही वाचा मुंबईकरांचे पाणी विजेने पळवले… पुढील काही दिवस पाणी कपातीचे! )

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी भारताला केलेली मदत तसेच, रशियाने भारताशी आजवर दाखवलेली बांधीलकी हे सगळे विसरल्याचं ट्विट एका नेटक-याने केले आहे.

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.