कोरोना मृत्यूंची संख्या कमी, पण मदतीचे प्रस्ताव अधिक!

101

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये मदत शासनाने जाहीर केली आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत आतापर्यंत १ हजार १४९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, ३०१ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १ हजार ५२७ एवढे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत; तर १ हजार ९३२ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, असेही यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.

पुन्हा अर्ज करा

आतापर्यंत १ हजार ९३२ प्रस्ताव दाखल झाले आहेत. ही मदत राज्य शासन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करते. त्यामुळे किती नातेवाईकांच्या खात्यात मदत जमा झाली याची माहिती मिळालेली नाही. दरम्यान ज्यांचे प्रस्ताव नामंजूर झालेले आहेत, त्यांनी कोणत्या कारणाने प्रस्ताव नामंजूर झाला ते निश्चित करून त्याप्रमाणे दुरूस्ती करून प्रस्ताव पुन्हा ऑफलाइन पद्धतीने दाखल करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.

( हेही वाचा: ईडीमुळे नवाब मलिकांची उच्च न्यायालयात गोची )

याच प्रस्तावांना देण्यात आली मंजूरी

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५२७  कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत; तर १ हजार ९३२ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, असेही यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले. शासनाच्या आयसीएमआर या वेबसाईटवर नोंद असलेल्या अकराशे प्रस्तावांना आतापर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. यातल्या कागदपत्रांची छाननी करण्याची गरज नसलेल्या दोनशे प्रस्तावांना राज्यस्तरावरून मंजुरी दिली आहे, तर ९०० प्रस्तावांना जिल्हा स्तरावर मंजुरी दिलेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.