Russia Ukraine War: भारतासाठी दुसरी दु:खद वार्ता, आणखी एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

129

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनमधील खारकीव्ह शहरात गोळीबार केला होता. यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी कुटुंबीयांनी सरकारला विनंती केली असून सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंजाब मधील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

… अन् उपचारादरम्यान झाला मृत्यू 

युक्रेनमधील पंजाबचा रहिवासी असलेल्या 22 वर्षीय चंदन जिंदालला आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय चंदन जिंदाल हा पंजाबमधील रहिवासी असून तो युक्रेनमधील विन्नित्सिया शहरातील मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता. जिंदालला मेंदूत इस्केमिक स्ट्रोक आल्याने त्याला याच शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी भारत सरकारला पत्र लिहिले आहे.

(हेही वाचा – काँग्रेसचे राजकीय भवितव्य संपुष्टात! ज्येष्ठ भाजप नेत्याचे मत )

पंजाबमधील बर्नाला येथील एस के जिंदाल यांचा मुलगा चंदन युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. युक्रेनमधील व्हेनेशिया शहरातील नॅशनल पिरोगोव्ह मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये 2018 मध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेतलेल्या चंदनला गेल्या 2 फेब्रुवारीच्या रात्री ब्रेन हॅमरेजमुळे अचानक रुग्णालयात नेण्यात आले. चंदन कोमात गेल्यावर डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीत शस्त्रक्रिया केली होती. वडील एस के जिंदाल हे 7 फेब्रुवारी रोजी भाऊ के के जिंदालसोबत युक्रेनला गेले होते. युद्धाची भीषणता वाढल्यानंतर केके जिंदाल भारतात परतले, पण त्यांचे वडील एसके जिंदाल तिथेच राहिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.