‘ब्रह्मविद्या साधक संघ’ या संस्थेमार्फत १० एप्रिलपासून ब्रह्मविद्येचा ऑनलाईन वर्ग मराठीतून सुरू होणार आहे. नियमित सराव व साधनेने आरोग्य, आनंद, यश संपादन करण्याची गुरुकिल्ली म्हणजे ब्रह्मविद्या.
अधिक श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी ब्रह्मविद्या उपयुक्त
ब्रह्मविद्येचे मराठीतून ऑनलाईन वर्ग येत्या १० एप्रिलपासून सुरू होणार असून, दर रविवारी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत हे वर्ग घेतले जाणार आहेत. या वर्गांचा कालावधी २२ आठवडे २२ रविवार असणार आहे. हे वर्ग ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार असल्यामुळे आपण कुठूनही जॉईन करू शकतो. या वर्गात प्राणायाम आणि श्वसनाचे सर्व प्रकार (Breathing exercise) शिकवले जाणार असून, यामुळे तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच या वर्गात ध्यानाच्या विविध पद्धतीही शिकवल्या जातात. या वयात प्रत्येकाच्या मनात ध्यानाबद्दल विविध कल्पना असतात. निरोधी, आरोग्यसंपन्न आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी या ध्यानाच्या पद्धतींचा खूप फायदा होतो. अधिक श्रेष्ठ जीवन कसं जगावं हे आपल्याला ब्रह्मविद्या शिकवते आणि १८ वर्षांवरील कोणताही व्यक्ती या वर्गात प्रवेश घेऊ शकतो, असे ब्रह्मविद्या शिक्षिका सुनिता पाठक यांनी सांगितले.
( हेही वाचा : महाराष्ट्र निसर्ग उद्यानात पहिल्यांदाच आले ‘हे’ पाहुणे )
ब्रह्मविद्या वर्गाची फी २२ आठवड्यांसाठी प्रत्येकी पाच हजार रूपये असणार आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर घरी या वर्गातील अभ्यासाक्रमाचे २२ पार्ट पाठवण्यात येतील तसेच हे वर्ग पूर्ण झाल्यावर नागरिकांना कायम सराव करण्यासाठी बुकलेटही देण्यात येईल असेही सुनिता पाठक यांनी सांगितले.
या वर्गात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक
https://brahmavidya.net/Online-Reg-Basic.php?CType=2&&ttid=800
शिक्षका : सुनिता पाठक
संपर्क. : 9920083570