अडीच किलो गांजा, गावठी पिस्तुलासह दोघे जेरबंद!

130

धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी धाडसी कारवाई करत मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्यांसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचा एक साथीदार मात्र फरार झाला आहे. पोलिसांनी अडीच किलो गांजा, गावठी पिस्तुल काडतुसे आणि रामपुरी चाकुसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काय आहे प्रकरण

मोहाडी पोलिसांचे पथक रात्री गस्तीवर असताना मुंबई-आग्रा महामार्गावर लळींग टोलनाक्याजवळ हॉटेल दरियासमोर उभ्या असलेल्या एमएच १६ – ७१५१ क्रमांकाच्या उघड्या जीपबाबत त्यांना संशय आला. मोहाडी पोलिसांचे पथक ट्रक जवळ पोहचले. त्यांनी ट्रक चालक-मालक नदीम मोहम्मद शमीन सिद्दीकि (वय ३२) रा. नवी मुंबई आणि असलमखान अलीयारखान पठाण (वय ४०) रा. प्रितमपुर चौपाटी हॅण्ड पंपाजवळ, महु जिल्हा धार (मध्यप्रदेश) या व्यापाऱ्याची चौकशी सुरु केली. दोघांकडे असलेल्या पिवळ्या पिशवीची तपासणी केली असता त्या पिशवीमध्ये आणखी एक पांढरी पिशवी होती. त्यावर इंडियन बकेट असे इंग्रजीत लिहिले होते. पिवशी उघडून पाहिली असता त्यात २ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला.

(हेही वाचा – राज्यातील ‘हे’ १४ जिल्हे होणार निर्बंधमुक्त!)

या दोघांना झाली अटक

तसेच, दुसऱ्या पिशवीत पंधरा हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तुल, जीवंत काडतुसे आढळून आली. रामपुरी चाकुही आढळून आला. पोलिसांनी जीपसह ३ लाख ८२ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. गांजाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पोलिसी कारवाई करत रात्री १ वाजेच्या सुमारास नदीम मोहम्मद आणि असल्म खान या दोघांना अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.