सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात घणघोर युद्ध सुरु आहे, अशा वेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या तीन बैठक झाल्या, ज्यामध्ये भारताने तीनही बैठकांमध्ये तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी रशियाकडून भारताचे स्वागत करण्यात आले. मात्र अमेरिका यावर काय भूमिका घेते हे पाहण्याची उत्सुकता होती, त्यानुसार अमेरिकेच्या सिनेट सदस्याने मत प्रदर्शित केले, त्यावेळी चक्क भारताचे कौतुक केले.
भारत तटस्थ राहिला, तरी…
संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत रशियाच्या निषेध करणारा प्रस्ताव मांडण्यात आला, त्याला १५७ देशानी पाठिंबा दिला तर ३५ देशांनी विरोध केला. त्यामध्ये भारताने तटस्थ भूमिका घेतली. ही गोष्ट अमेरिकेला खटकणारी आहे. पण तरीही जो बायडेनपासून ते अनेक अधिकारी आणि सिनेटर्सपर्यंत, सर्व जण भारतासोबतची आपली मैत्री मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत .दोन्ही देशांमधील वाढत्या मैत्रीसाठी अमेरिका भारतातील लोक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आभारी आहे, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ सिनेटरने म्हटले आहे.
(हेही वाचा धक्कादायक! युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांचा ढाल म्हणून करतेय वापर!)
निअर इस्ट, दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि दहशतवादविरोधी सिनेट फॉरेन रिलेशन्स उपसमितीचे अध्यक्ष सिनेटर ख्रिस मर्फी म्हणाले, अमेरिका – भारत संबंध खरोखरच कधीही मजबूत राहिलेले नाहीत. संयुक्त राज्य अमेरिका आपल्या वाढत्या मैत्रीसाठी भारतातील लोक आणि पंतप्रधान मोदी यांची आभारी आहे. भारत-अमेरिका संबंधांवर सिनेटर्स काँग्रेसच्या सुनावणीदरम्यान बोलताना, कनेक्टिकटमधील डेमोक्रॅटिक सिनेटर आपल्या सुरुवातीच्या टिप्पण्यांमध्ये म्हटले, चांगल्या कारणाने द्विपक्षीय संबंध वाढत आहेत, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community