… तर तुम्हालाही येणार अकाली बहिरेपणा!

३ मार्च जागतिक श्रवण दिन

101

तुमच्या कानातून सतत आवाज येत आहे का? हे लक्षण साधं नसून कदाचित बहिरेपणाची प्राथमिक सुरुवात असू शकते. तुमच्या शरीरात असंख्य एन्टीबोटीक औषधांच्या भडिमार होत असेल तर तुम्हाला अकाली बहिरेपणाची सुरुवात होत असल्याचे समजून घ्या. कानाच्या तपासणीतून आता एन्टीबोटीक औषधांच्या दुष्परिणामामुळे होणा-या दुष्परिणामाचा आढावा वेळीच घ्या आणि उपचार सुरु करा, असे आवाहन कान-नाक-घसा तज्ज्ञ यांनी दिला आहे.

क्षयरोगाच्या उपचारांत ज्या रुग्णांना मल्टी ड्रग थेअरपी सुचवली जाते, त्या रुग्णांना कायमचं आणि अकाली बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते, अशी माहिती कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयाचे कान-नाक-घसा प्रमुख डॉ संजय हेलाले यांनी सांगितले. या रुग्णांवर ज्या इंजेक्शनच्या माध्यमातून उपचार दिले जातात. त्यातून हळूहळू कानाच्या नसा कमजोर होत जातात. हे उपचार क्षयरोगावर गोळ्यांच्या उपचारांतूनही रोग नियंत्रणात येत नसेल तरच दिले जातात. या उपचारपद्धतीतून क्षयरोगाचा जिवाणू शरीरातून मारला जातो. परंतु हे इंजेक्शन्स कित्येक वर्ष रुग्णाला दिले जाते परिणामी रुग्णाला बहिरेपणा येण्याची शक्यता दुणावते.

…तर बहिरेपणाची संभाव्यताही जास्त 

रुग्णाला बहिरेपणा आल्यावर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून कानावर कायमची मशीन बसवली जाते. तुमच्या इतर आजारांच्या उपचारांत अमायनोक्लायकोसाईड हे एन्टीबायोटीक औषध असेतर बहिरेपणाची संभाव्यताही जास्त ल आहे. या औषधामुळे कान आणि किडनीवरही परिणाम होतो. त्यासाठी तुम्ही नियमित कानांची तपासणी सुरु करा, असा सल्ला कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ संजय हेलाले देतात.

(हेही वाचा – आपल्या बाळाचा श्रवणदोष टाळायचाय? तर ही घ्या काळजी…)

तुम्ही दीर्घकालीन आजाराला सामोरे जात असाल तर तुमच्या औषधांच्या उपचारात एन्टीबायोटीक किती आहे, याची माहिती घेत कानाची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचा सल्ला नेरुळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयाचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ तुषार बोराडे देतात. क्षयरोगावर उपचार घेणा-या रुग्णांना उपचारांतील औषधांबाबत तसेच संभाव्य धोक्यांबाबत कल्पना दिली जाते. मात्र इतर दीर्घकालीन आजारांत ही संभाव्यतेचा रुग्णांना फारसा परिचय नसतो. अशावेळी ऐकणे कमी होत असल्यास स्थानिक दवाखान्यांत उपचार घेण्याला प्राधान्य देऊ नका, तातडीने कान-नाक-घसा तज्ज्ञांचा सल्ला घेत उपचार सुरु करा. वेळेवर उपचार सुरु केल्यास कायमस्वरुपीच्या बहिरेपणातून रुग्ण वाचू शकतो, अशी आशाही कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ तुषार बोरोडे यांनी व्यक्त केली.

कानाची तपासणी करताना 

एन्टीबायटीक औषधांच्या उपचारांतील रुग्णांनी किमान तीन महिन्यानंतर कानाच्या ऐकण्याच्या क्षमतेची चाचणी करणे आवश्यक आहे. या चाचणीकरिता कान-नाक-घसा तज्ज्ञ किमान हजार रुपये आकारतात. प्रत्येक वेळी कानाची ऐकण्याची क्षमता तपासली जाते. जर ऐकण्याच्या क्षमतेत सकारात्मक बदल दिसला नाही. तर वैज्ञानिक भाषेत कान ‘डेड इअर’ म्हणून संबोधला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.