‘या’ कारणास्तव महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन!

105

चित्रपट प्रदर्शनापूर्वी अनेक अभिनेते-अभिनेत्री सिद्धिविनायक येथे जाऊन बाप्पाचे आवर्जून दर्शन घेतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज श्री. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. अभिनेते व पुत्र अभिषेक बच्चनही त्यांच्या सोबत होते. अमिताभ बच्चन व अभिषेक यांनी सिद्धीविनायकाची मनोभावे पूर्जा केली. यावेळी सिद्धिविनायक मंदिर देवस्थानचे विश्वस्त व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राजाराम देशमुख यांनी अमिताभ बच्चन यांना बाप्पाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कारही केला.

( हेही वाचा : #WorldWildlifeDay देशातील वन्यजीव आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी टॉप ५ पर्यटनस्थळे! )

झुंड चित्रपट प्रदर्शित होणार 

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपट उद्या ४ तारखेला प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटाबद्दल चित्रपटरसिकांच्या व अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. झुंड चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी अमिताभ बच्चन यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन बाप्पाची मनोभावे प्रार्थना केली व बाप्पाचे आशिर्वाद घेतले.

चित्रपटासाठी शुभेच्छा

मंदिर समितीच्या वतीने राजाराम देशमुख यांनी बच्चन यांना बाप्पाची शाल व मूर्ती भेट दिली आणि झुंड या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.