सोलापूर राज्यातील गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून, आतापर्यंत १८९ साखर कारखान्यांनी ८२३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातून ८४४.८९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग पहिल्या क्रमांकावर तर सोलापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. उताऱ्यात सोलापूरचा क्रमांक खाली आला असून, कोल्हापूर पहिल्या, पुणे दुसऱ्या तर नांदेड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गाळप हंगाम आणखी १५ दिवस
राज्यातील गाळप हंगाम आणखी १५ दिवस चालण्याची शक्यता आहे. कोल्हापूर विभागातील २६ सहकारी व १० खासगी साखर कारखान्यांनी २१९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २५६ लाख क्विंटल साखर उत्पादन केली आहे. सरासरी उतारा ११.६७ टक्के मिळाला आहे. पुणे विभागातील १६ सहकारी व १३ खासगी साखर कारखान्यांनी १८८.९५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १९६ लाख क्विंटल साखर उत्पादन केली आहे. १०.४१ टक्के उतारा मिळाला आहे.
(हेही वाचा – Russia Ukraine War: भारताच्या सुरक्षेसाठी रशियाने घेतला मोठा निर्णय!)
सोलापूर विभागातील १६ सहकारी व ३० खासगी साखर कारखान्यांनी २२० मेट्रिक टन उसाचे गाळप करून २०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. उतारा ९.२५ टक्के मिळाला आहे. अहमदनगर विभागातील १७ सहकारी व १० खासगी कारखान्यांनी १२८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून १२४.८६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ९.७५ टक्के उतारा मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community