भारत-श्रीलंका यांच्यात शुक्रवारपासून पहिली कसोटी सुरू होणार आहे. ही कसोटी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीची ही १०० वी कसोटी असणार आहे. विराटची १०० वी कसोटी मॅच असल्यामुळे बीसीसीआयने ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. रोहित शर्मा याची कर्णधार म्हणून पहिली, तर विराट कोहलीची ही १०० वी कसोटी असणार आहे. ट्वीटरवर सर्वत्र विराटच्या चाहत्यांनी #100thTestForKingKohli, #VK100 असे हॅशटॅग ट्रेंड केले आहेत. या कसोटी सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला आहे.
( हेही वाचा : बीसीसीआयच्या महाव्यवस्थापक ऑपरेशन्सपदी अभय कुरुविला यांची नियुक्ती )
विराटची १०० वी कसोटी खास बनवू
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली मोहालीत १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. भारतासाठी ही खरोखरच मोठी गोष्ट असून, कोहलीने आतापर्यंत टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. संपूर्ण संघ विराटची १०० वी कसोटी खास बनवेल असे कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले. दरम्यान, विराट कोहलीने आपल्या शंभराव्या कसोटीच्या पूर्वसंध्येला एक व्हिडिओ शेअर करत या कसोटीबाबत आपल्या काय भावना आहे हे सांगितले. हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. मी स्वतःला नशीबवान आहे मी १०० वी कसोटी खेळू शकलो. मी माझ्या फिटनेसवर खूप काम केलं. हा माझ्या आणि माझ्या कुटुंबियांसाठी मोठा क्षण आहे. असे विराट कोहली म्हणाला.
🚨 𝗦𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 𝗙𝗲𝗮𝘁𝘂𝗿𝗲 𝗔𝗹𝗲𝗿𝘁 🚨
We get up, close and personal with @imVkohli as he is all set to play his 1⃣0⃣0⃣th Test tomorrow at Mohali. 👏 👏 #TeamIndia | #VK100 | #INDvSL | @Paytm
Watch the full interview 🎥 🔽https://t.co/IwTW6nZ1ds pic.twitter.com/p6F7ltviCW
— BCCI (@BCCI) March 3, 2022
चाहत्यांचे ट्वीट
विराट कोहलीकरता त्यांच्या चाहत्यांनी ट्वीटरवर हॅशटॅग ट्रेंड केले आहेत. तसेच आपल्या लाडक्या किंग कोहलीला १०० व्या कसोटीसाठी चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
You are my source of joy. I think about your batting even in dreams. Have enjoyed your peak for years. Celebrated your achievements like mine. Sad that you no longer lead but can't wait to see you scoring for fun again. Go well King👑. Proud of you.#100thTestForKingKohli#VK100 pic.twitter.com/U8cUi4BI4Y
— Sai Krishna💫 (@SaiKingkohli) March 3, 2022
Join Our WhatsApp Community