प्रभादेवी, वरळीत १,२७५ सदनिका, पण कोणत्या प्रकल्पबाधितांसाठी?

104

मुंबई महापालिकेच्यावतीने प्रभादेवी व वरळीमध्ये प्रकल्पबाधितासांठी १,२७५ सदनिका बांधण्यास सुधार समितीने मंजुरी दिली आहे. प्रभादेवीमध्ये गोमाता नगर येथे टिडीआर अधिक प्रत्येक सदनिका मागे १७ लाख ३१ हजार रुपये मोजून तसेच प्रभादेवीमध्ये जमीन व बांधकामांच्या टिडीआर देऊन प्रत्येक सदनिकामागे ८५ लाख रुपयांची रक्कम देऊन या सदनिका बांधून घेण्यासाठी कंत्राटदार तसेच विकासकाची नेमणूक केली जाणार आहे. परंतु या प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका या भविष्यात न्हावा-शेवा प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांसाठी वापरल्या जाण्याची शक्यता असून महापालिकेच्या प्रकल्पांसाठी सदनिकांची संख्या आधीच कमी असताना या सदनिकांवर सरकारचा डोळा असल्याची चर्चा आहे.

महापालिकेच्यावतीने ७५० सदनिका बांधल्या जाणार

वरळीतील साई सुंदर नगर, गोमाता नगर आणि सुरुची नगर येथील झोपु योजनेसाठी दिलेल्या महापालिकेच्या भूखंडावर बांधलेल्या संक्रमण शिबिराच्या जागी महापालिकेच्यावतीने ७५० सदनिका बांधल्या जाणार आहे. यासाठी टीडीआर व रोख रक्कम १७ लाख ३१ हजार रुपयांच्या बदल्यात सदनिकेचे बांधकाम करुन देण्यासाठी देव इंजिनियर्स व एम.बी.इन्फ्रास्ट्रक्चर व्हीएनसी या संयुक्त भागीदारीतील कंपनीला काम देण्याचा प्रस्तावाला सुधार समितीने मंजुरी दिली. यासाठी एकूण १२९.८२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. पुढील १५ महिन्यांमध्ये यासर्व सदनिकांचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित आहे. या बांधकामासाठी आसीसी बांधकामाच्या तुलनेत अल्टा हाय परफॉर्मन्स काँक्रिटचे तंत्राचा वापर केला जाणार आहे.

हायप्रोफाईल प्रकल्पबाधित सदनिकांचे वितरण करण्यासाठी धोरण?

मुंबई महापालिकेच्यावतीने प्रभादेवीतील राजाभाई देसाई रस्ता व सदानंद हसू तांडेल रस्त्याजवळील जागेत प्रकल्पबाधितांकरता ५२९ सदनिकांची बांधणी केली जाणार आहे. एकूण ३३१७ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आहे. जमीन आणि बांधकामच्या टिडीआर बदल्यात खासगी विकासकाच्या माध्यमातून या सदनिका बांधून घेतल्या जाणार असून यासाठी प्रत्येक सदनिका मागे टिडीआर व क्रेडीट नोटच्या रुपाने ८५ लाख रुपये महापालिका मोजले जाणार आहे. त्यामुळे या ५२९ सदनिकांकरता एकूण ४४९.६५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. क्लासिक प्रोमोटर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड या विकासकाच्या मालकीची हा मोकळा भूखंड असून त्यावर प्रकल्प व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी सुमारे ५२९ सदनिका बांधून भूखंडांसह महापालिकेला हस्तांतरीत केल्या जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी पार पडलेल्या सुधार समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. या दोन्ही प्रस्तावांना भाजपने तीव्र विरोध केला आहे. भाजपचे सुधार समिती सदस्य अभिजित सामंत यांनी प्रभादेवीतील ५२९ सदनिका बांधण्यासाठी प्रती सदनिका मागे टिडीआर व क्रेडीट नोटच्या रुपाने ८५ लाख रुपये दिले जाणार असले तरी या सदनिकेसाठी एकूण १ कोटी ५७ लाख ३० हजार ५१७ रुपये एवढा खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पबाधितांसाठी या सदनिका महापालिकेला परवडणार का असा सवाल त्यांनी केला. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून हायप्रोफाईल प्रकल्पबाधित सदनिकांचे वितरण करण्यासाठी धोरण अस्तित्वात आहे का? या सदनिका वितरणात पुन्हा भ्रष्टाचार होणार नाही का असा सवाल केला.

(हेही वाचा – शिवसेनेचा ‘हा’ पदाधिकारी मुंबई महापालिका निवडणुकीत सेनेला बुडवणार का?)

विशेष म्हणजे न्हावा-शेवा प्रकल्पामध्ये प्रभादेवीमध्ये काही वस्त्या आणि इमारती बाधित होत असून त्यांच्या पुनर्वसनासाठीच हा प्रकल्पबाधितांच्या सदनिका बनवल्या जात असल्याची चर्चा ऐकायला येत आहे. महापालिकेच्या प्रकल्पांसाठी सदनिकांची आवश्यकता असून प्रत्यक्षात महापालिकेऐवजी शासनाच्या या प्रकल्पासाठीच सत्ताधारी पक्षाची घाई चालली आहे असेही बोलले जात आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.