राज्यात अचानक उद्भवलेली कोरोनाची तिसरी लाट ही ओमायक्रॉनच्या कोरोनाच्या नव्या विषाणूचीच असल्याचा दावा राज्याच्या आरोग्य विभागाने केलेला असताना मुंबईतही १०० टक्के ओमायक्रॉनचेच रुग्ण आढळून आल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दहाव्या जनुकीय चाचणीच्या अहवालातील निष्कर्ष गुरुवारी सादर केला. त्यात ही माहिती उघडकीस आली.
- दहाव्या जनुकीय अहवालासाठी घेतलेले एकूण नमुने – ३७६
- मुंबईतील जनुकीय अहवालासाठीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या – २३७
- मुंबई बाहेरील जनुकीय अहवालासाठी घेतलेल्या नमुन्यांच्या संख्या – १३९
मुंबईतील २३७ रुग्णांची वयोगटानुसारचीसंख्या व टक्केवारी
तरुण ते ज्येष्ठ वयोगट
२१ ते ४० वयोगट – ६९ रुग्ण (२९टक्के)
४१ ते ६० वयोगट – ६९ रुग्ण (२९टक्के)
६१ ते ८० वयोगट – ५९ रुग्ण (२५ टक्के)
(हेही वाचा – एकाच दिवसात ‘या’ शहरात २३४ कोरोनाचे रुग्णांची नोंद)
लहान ते तरुणांपर्यंतचा वयोगट
१३ ते १८ वयोगट – १२ रुग्ण
६ ते १२ वयोगट – ९ रुग्ण
० ते ५ वयोगट – ४ रुग्ण
अहवालातील प्रमुख निष्कर्ष
० कोरोनाची बाधा झालेल्या कोणालाही गंभीर लक्षणे नव्हती
० २३७ पैकी केवळ ६ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधात्मक पहिलीच लस घेतली
० कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या १२८ रुग्णांपैकी ८ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एकाला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले तर एकाला ऑक्सिजनची गरज भासली
० १०३ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधात्मक एकही लस घेतली नव्हती. त्यापैकी १८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. दोन रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले तर एकाला ऑक्सिजनची गरज भासली.