मुंबईकरांसाठी लवकरच सुरू होणार नवीन रेल्वे स्थानक!

149

दिघा रेल्वे स्थानकाच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात असून ७० टक्के काम पूर्ण झाले असून या वर्षी नोव्हेंबरपर्यंत ही सुविधा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. हे रेल्वे स्थानक 110 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. जवळपास सहा वर्षांनंतर हे मुंबईतील नवीन रेल्वे स्थानक असणार आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन बांधते स्थानक  

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) 3 अंतर्गत ऐरोली-कळवा उन्नत रस्त्याचा एक भाग म्हणून हे रेल्वे स्थानक बांधत आहे. ऐरोली-कळवा कॉरिडॉर मुंबईच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गाला जोडणार आहे. ठाण्यातील उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी 2014 मध्ये 420 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला होता. हा प्रकल्प दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण केले जाणार आहे. एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे रेल्वे स्थानक 110 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. जवळपास सहा वर्षांनंतर हे मुंबईतील नवीन रेल्वे स्थानक असेल.

(हेही वाचा महाविकास आघाडीतील ‘हे’ आहेत डागाळलेले मंत्री!)

दिघा परिसरात राहणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा 

दिघा रेल्वे स्थानकाचे सुमारे 60-70 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि आम्ही ते नोव्हेंबर 2022 पूर्वी जनतेसाठी खुले करू,अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत प्लॅटफॉर्मसह स्थानकाची इमारत तयार झाली आहे आणि प्लॅटफॉर्मच्या छतावरचे काम सुरू झाले आहे. विद्युतीकरणाशी संबंधित कामही प्रगतीपथावर आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल, असे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी सांगितले. ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेले दिघा रेल्वे स्थानक सुरू झाल्याने मध्य किंवा ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या आणि दिघा परिसरात राहणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र रेल्वे स्थानक उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ऐरोली रेल्वे स्थानक किंवा ठाणे रेल्वे स्थानकावर जावे लागत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.