Russia Ukraine War: कीवमधील गोळीबारात आणखी एक भारतीय विद्यार्थी जखमी

117

युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात आणखी एक भारतीय सापडला आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळी लागल्याने एक भारतीय विद्यार्थी जखमी झाला आहे. विद्यार्थी कीव सोडण्याचा प्रयत्न करत होता. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी परत नेण्यात आले आहे. याआधी खार्किव येथे झालेल्या रशियन हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता आणि रुग्णालयात दाखल झालेल्या अन्य एका विद्यार्थ्यालाही आपला जीव गमवावा लागला होता. या युद्धात आत्तापर्यंत 1500 युक्रेनियन नागरिक जखमी झाले आहेत.

कीव सोडताना या विद्यार्थ्याला लागली गोळी

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या नवव्या दिवशी भारतासाठी ही आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये झालेल्या गोळीबारात एक भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्हीके सिंग यांनी शुक्रवारी दिली. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी व्हीके सिंग सध्या शेजारच्या पोलंडमध्ये आहेत. कीव सोडताना एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती आज त्यांना मिळाली असल्याचे मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. त्याला पुन्हा कीव येथे नेण्यात आले आहे. सिंग म्हणाले की, कमीत कमी नुकसानासह जास्तीत जास्त भारतीय युक्रेनमधून बाहेर पडावेत यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

(हेही वाचा – Operation Ganga Outbreak: आतापर्यंत युक्रेनमधून किती भारतीय परतले मायदेशी, वाचा…)

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारत युद्धग्रस्त देशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना रोमानिया, हंगेरी आणि पोलंडमार्गे मायदेशी परत करत आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी युक्रेनमधील खार्किव येथे कर्नाटकचा विद्यार्थी नवीन शेखऱअप्पा याचा गोळीबार हल्ल्यात बळी गेला होता. या घटनेच्या वेळी तो स्वत:साठी आणि सहकारी विद्यार्थ्यांसाठी जेवण घेण्यासाठी बाहेर पडला होता आणि या प्रसंगी काळाने त्यावर घाला घातला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.