भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन वर्ष होऊन गेले आहे. सर्वच भारतीयांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. लस न घेतल्यामुळे 92 टक्के भारतीयांना कोरोनाच्या तिस-या लाटेत आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे भारतीयांना पुन्हा एकदा लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले आहे.
लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. भारतीय संशोधन परिषदे(ICMR)चे महासंचालक बलराम भार्गव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या आवाजात होणार महागर्जना!)
92 टक्के नागरिकांचा मृत्यू
भारतात लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मृत्यूदर कमी झाल्याचे कळते. कोरोनाच्या तिस-या लाटेत आपले प्राण गमवावे लागलेल्या रुग्णांपैकी 92 टक्के रुग्णांचे लसीकरण झाले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. इंडिया व्हॅक्सिन ट्रॅकरच्या डेटाबेसचा आधार देत भार्गव यांनी ही माहिती दिली.
लसीकरणाचा प्रभाव जास्त
वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी देखील लसीचा प्रभाव मोजण्यात आला आहे. लसीच्या पहिल्या डोसची परिणामकारकता 98.9 टक्के तर दोन्ही डोसची परिणामकारकता 99.3 टक्के आहे. कोविन, आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविड इंडिया पोर्टलवरुन एकत्रित करण्यात आलेल्या डेटावरुन 94 कोटी व्यक्तींपैकी सुमारे 15 कोटी नागरिकांचा पहिला डोस तर 73 कोटी भारतीयांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. तर 5 कोटी नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.
(हेही वाचाः दिव्यागांना मोफत आणि प्राधान्याने वैद्यकीय उपचार, शिवसेनेची मागणी)
त्यामुळे जास्तीत-जास्त भारतीयांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community