महिला दिनाला जगभरात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदानाची आकडेवारी लक्षात घेता 8 मार्चला पुण्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनी पीएमपी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. नगरसेवकांकडून या अभिवन प्रयोगाची योजना करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीकडून तसा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
( हेही वाचा : दिव्यागांना मोफत आणि प्राधान्याने वैद्यकीय उपचार, शिवसेनेची मागणी )
पालिकेला आर्थिक झळ
महिला आणि बालकल्याण समितीने असा ठराव मंजूर केला असला, तरी हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्याची अंमलबजावणी मुख्य सभेच्या मान्यतेनंतरच होणार आहे. मात्र, निवडणूक आल्याने याबाबतचा निर्णय घेतला जावा, यासाठी नगरसेवकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु, या उपक्रमातून पालिकेलाच आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
मोफत प्रवास
एप्रिल किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठड्यात पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यातच दहा दिवसांत म्हणजेच 14 मार्चला पालिकेची मुदत संपुष्टात येत आहे. आणि जागतिक महिला दिन 8 मार्चला आहे. त्यामुळे या दिवशी महिला मतदारांना खूश करण्यासाठी सदर उपक्रम राबविण्याची मागणी होत आहे. महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमही नगरसेवकांकडून 8 मार्चला राबविण्यात येणार आहेत. याच कारणातून महापालिकेच्या खर्चातून महिलांना मोफत प्रवासाचा उपक्रम राबविला जात आहे.
Join Our WhatsApp Community