दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ ३ ते ६ मार्चपर्यंत मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चविष्ट, झणझणीत, लज्जतदार मिसळ म्हणजेच प्रत्येकाची जीव की प्राण! या महोत्सावत विविध प्रकारच्या मिसळचा तुम्हाला आस्वाद घेता येणार आहे. शनिवारी आणि रविवारी सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत खवय्ये या महोत्सवात सहभागी होऊ शकतात.
मिसळ महोत्सव
पुणेरी, मामलेदार, नादखुळा, राजेशाही, स्पेशल, चवदार, चुलीवरची, मालवणी वडे मिसळ असे विविध स्टॉल याठिकाणी लावण्यात आले आहेत. मिसळ व्यतिरिक्त बर्फाचा गोळा, खायचे पान, आइस्क्रिमचा आस्वादही तुम्ही घेऊ शकता. मिसळच्या एका थाळीची किंमत कमीत कमी १०० रुपये आहे. मिसळची थाळी तर्री, मिसळ पाव, पापड, फरसाण, गोड पदार्थांनी परिपूर्ण अशी आहे. याठिकाणी चुलीवरची मिसळ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
( हेही वाचा : #WorldWildlifeDay देशातील वन्यजीव आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी टॉप ५ पर्यटनस्थळे! )
खवय्यांना नाशिकपासून नगरची, पुण्यापासून कोल्हापूरची, जुन्नर, कल्याण, ठाणे, चाकण, देहू रोड, कराड, सांगली, शिरूर अशा विविध शहरांच्या मिसळच्या चव एकाच छताखाली चाखता येणार आहे.
View this post on Instagram