मुंबई महापालिकेच्या सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पाला महापालिका सभेत मंजुरी देण्यात आली आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या मूळ अंर्थसंकल्पात ६५० कोटी रुपयांच्या निव्वळ निधीमध्ये अंतर्गत फेरफारासह महापालिका सभेत याला मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प मंजूर करताना महापालिकेने इतिहास रचला असून अवघ्या दोन दिवसांमध्ये कोणत्याही चर्चेविना महापालिका सभेत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आला आहे.
चर्चेविना मंजूर झालेले एकमेव अर्थसंकल्प
मुंबईच्या विद्यमान महापालिकेची मुदत ७ मार्चपर्यंत असून महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सन २०२२-२३चा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केल्यानंतर स्थायी समितीत ६५० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारासह मंजूर केल्यानंतर गुरुवारी झालेल्या महापालिका सभेत समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सादर केले. परंतु त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी ४५, ९४९.२१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. प्रथेप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय चर्चेला सुरुवात होते आणि सभागृहनेत्यांच्या भाषणाने समारोप होतो. परंतु या अर्थसंकल्पावर ना विरोधी पक्ष नेत्यांचे भाषण झाले ना विरोधी पक्षनेत्यांचे. कोणत्याही चर्चेविना मंजूर झालेले एकमेव अर्थसंकल्प आहे.
नवीन महापौरांकडून निधीचे वाटप होणार
स्थायी समितीत ६५० कोटी रुपयांचा फेरफार केल्याने हा ठोक निधी पायाभूत सेवा सुविधांकरता वापरण्यात येणार आहे. परंतु याची प्रत्येक नगरसेवकांच्या शिफारशीनुसार विकास कामांची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे नव्याने येणाऱ्या नगरसेवकांना आपल्या विकासकामांची शिफारस या ६५० कोटी रुपयांमध्ये करता येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन महापौरांना या निधीचे वाटप करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community