भाजप आमदार नितेश राणेंनी सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियानवर आरोप केले होते. यानंतर दोघांविरोधात मालवणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. महिला आयोगानेही याची दखल घेतली. त्यानंतर राणेंना शनिवारी पोलीस चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, नितेश राणेंसह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे. अशातच नितेश राणेंनी दिशा सालियन प्रकरणी एक ट्वीट केले आहे.
(हेही वाचा – “युक्रेनहून भारतीयांना मायदेशी आणण्याची केंद्राची कामगिरी कौतुकास्पद!”)
काय आहे राणेंचं ट्विट
‘खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे, न्याय मिलेगा’ असे म्हणत दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंनी ट्वीट केले आहे. सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करणार असे सांगत नितेश राणेंनी #JusticeForDishaSalian असा हॅशटॅग देत ट्वीट केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना शनिवारी चौकशीसाठी दुपारी 1 वाजता हजर राहावे लागणार आहे. दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी त्यांना न्यायालयाने 10 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. दिशाच्या कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांनी विरोधात तक्रार केली आहे त्या प्रकरणात आज नारायण राणे आणि नितेश राणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावतील.
Khel aapne shuru kiya hai..
khatam hum karenge..Nyay milega!! #JusticeForDishaSalian
— nitesh rane (@NiteshNRane) March 5, 2022
राणेंचा पाय खोलात जाण्याची शक्यता
नितेश राणे यांनी शनिवारी केलेल्या सूचक वजा इशारा देणाऱ्या ट्वीटने आगामी दिवसात बदलांचं राजकारण बघायला मिळण्याची शक्यता आहे. राणे आणि महाविकास आघाडी यांच्यातही गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, राज्य सरकारने नारायण राणेंना अटक करण्यास पोलीस पाठवले होते. त्यानंतर आता दिशा सालियाच्या प्रकरणात राणेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
राणेंना न्यायालयाने थोडा दिलासा
दरम्यान, नारायण राणे आणि नितेश राणे यांना न्यायालयाने थोडा दिलासा दिला होता. दिशा सालीयान आत्महत्या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे विरोधात मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस देखील पोलिसांनी पाठवली होती. मात्र, दिंडोशी कोर्टाकडून त्यांना अंतरिम दिलासा मिळाला. या पिता-पुत्रांना येत्या १० तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परंतु, पोलिसांसमोर हजर होऊन चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश दिल्याने राणे आज मालवणी पोलिसात हजर होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community