पोषण अभियान जनआंदोलन कार्यक्रमात ‘या’ राज्याचा प्रथम क्रमांक!

110

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत राज्यामध्ये जिल्हा स्तरावर तसेच प्रकल्प स्तरावर पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दि.08 मार्च रोजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रशस्तिपत्रक देऊन गौरव

“पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रम” सर्वोत्कृष्ट सहभागाबद्दल रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, यानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक यांना ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवले जाणार आहे.

( हेही वाचा: युद्धग्रस्त युक्रेनहून महाराष्ट्रातील ‘इतके’ विद्यार्थी सुखरुप परतले! )

विशेष कौतुक आणि आभार

नुकतेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित महिलांच्या विशेष मेळाव्यात राज्य पोषण संसाधन कक्ष, पोषण अभियानच्या आयुक्त तथा राज्य प्रकल्प संचालक रुबल अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक यांचे पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात रायगड जिल्ह्याने दिलेल्या सर्वोत्कृष्ट सहभागाबद्दल विशेष कौतुक करून आभार मानले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.