नेमबाजी विश्वचषक स्पर्धा: ‘सावरकर रायफल क्लब’च्या रुचिता विनेरकर यांना सुवर्णपदक

149

इजिप्तमधील कैरो येथे २८ फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान आयोजिलेल्या नेमबाजीच्या विचषक स्पर्धेत मराठमोळ्या रुचिता विनेरकर यांनी आणि तिच्याबरोबरच्या निवेथा आणि इशा सिंग यांनी स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल सांधिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. रुचिता या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर रायफल क्लबच्या सदस्य असून त्यांच्या या कामगिरीमुळे सावरकर स्मारकाच्या या रायफल क्लबची कामगिरी आता अधिक उंचावली आहे.

रुचिता विनेरकर यांची स्पृहणीय कामगिरी

रुचिता विनेरकर या रेल्वेमध्ये कर्मचारी असून सावरकर रायफल क्लबमध्ये नियमित सरावासाठी येतात. गुरुवार दि. ३ मार्च या दिवशी त्यांनी एअर पिस्तुल प्रकारातील सांघिक स्पर्धेत केलेल्या स्पृहणीय कामगिरीमुळे भारतीय संघ सुवर्णपद मिळवू शकला आहे. भारताच्या या महिला त्रिकुटाने १६ अचूक लक्ष्यवेध करताना भारताच्या खात्यावर दुसरे सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक जमा केले. दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदकासह भारतीय संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे.

(हेही वाचा – कोकण किनाऱ्यावर झाले दुर्मिळ कासवांच्या पिल्लांचे दर्शन!)

सावरकर स्मारकाच्यावतीने होणार सन्मान

या निमित्ताने सावरकर स्मारकाच्यावतीने रुचिता विनेरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर तसेच रायफल क्लबचे विश्वजीत शिंदे यांनी दिली. हा समारंभ सावरकर स्मारकाच्या सभागृहात रविवारी दि. ६ मार्च या दिवशी सकाळी ९ वाजता होणार आहे. या समारंभाला काही राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते तसेच छत्रपती पुरस्कार विजेते तसेच मान्यवर उपस्थित राहातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.