शनिवारी राज्यात ९५३ कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचारानंतर घरी सोडल्यानंतर आता केवळ ४ हजार ३८ रुग्ण राज्यातील विविध भागांत उपचार घेत आहेत. मात्र पहिल्यांदाच राज्यातील नव्या नोंदीत तब्बल ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण जनुकीय तपासणीच्या अहवालातून ओमायक्रॉनबाधित असल्याचे समोर आले आहे.
ओमायक्रॉनचे सर्वच रुग्ण नागपूरात
राज्यात नव्या ५३५ रुग्णांपैकी ४५४ ओमायक्रॉनचे रुग्ण जनुकीय अहवाल तपासणीतून समोर आले. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अहवालातून समोर आले. सर्वच रुग्ण नागपूरात आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. नागपूरात आता केवळ १९० कोरोनाबाधित रुग्णांची संख्या उरली आहे.
१८४ रुग्णांचा जनुकीय तपासणीचा अहवाल प्रलंबित
मात्र, राज्यातील विविध भागांतून नोंद झालेल्या १८४ रुग्णांचा जनुकीय तपासणीचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे. तर शनिवारी १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.
(हेही वाचा – उद्घाटन सोहळ्यातही मोदी जपणार महाराष्ट्राची संस्कृती!)
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९८.०७ टक्के
- राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के