पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुण्याच्या दौऱ्यावर आले आले, तेंव्हा पूर्वनियोजनुसार त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांच्या दौऱ्याचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदींचा निषेध कारणारे फलक हाती घेतले होते, तसेच मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या आणि अर्धवट पुणेरी मेट्रोचे काम करुन पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या, मोदींनी परत जावे, अशा घोषणा आंदोलक करत होते.
मोदी परत जा…
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर करणार आहे, मेट्रोचे उदघाटन करणार आहेत, तसेच एमआयटीच्या मैदानाचे उदघाटन करणार आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांचे स्वागत पुण्यात विरोधाने करण्यात आले. पुण्यातील अलका चौक येथे ‘महाराष्ट्रद्रोही मोदी परत जा, महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदींचा विरोध अशा घोषणा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते करत होते. यावेळी पोलीस प्रशासनाने, पुणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणारे काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी आणि समस्त कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले. त्यांना अलका चौकात रोखण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत भाषण करतांना त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसकडून कोरोना प्रसार झाला, असे म्हटले होते, त्यामुळे त्यांचा विरोध करण्यात आला.
Join Our WhatsApp Community