पंतप्रधानांकडून शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, मेट्रोमध्ये बसून प्रवास…

125

पंतप्रधान मोदी त्यानंतर पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. यावेळी त्यांना पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी राजमुद्रा असलेला शाही फेटा पंतप्रधान मोदी यांना घातला.

शिवरायांना केले अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

(हेही वाचा पंतप्रधान मोदींचे स्वागत, मुख्यमंत्री मात्र गैरहजर! कारण काय?)

मेट्रोचे केले उदघाटन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उदघाटन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पुणे मेट्रोचे उदघाटन केले. गरवारे मेट्रो स्थानकात  पंतप्रधान मोदी यांनी बटन दाबून हिरवा झेंडा दाखवून मेट्रोला प्रकल्पाचे लोकार्पण केले. त्यावेळी त्यांनी पहिले तिकीट काढले. मेट्रोमध्ये बसल्यावर पंतप्रधान मोदी यांनी दिव्यांग प्रवाशांशी संवाद साधला. या मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष डबा आहे.

Modi 1

(हेही वाचा पुण्यात पंतप्रधान मोदींचे स्वागत काळ्या झेंड्याने…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.