पुणे दौ-यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रती नाराजी व्यक्त केली. राज्यपाल कोश्यारी यांनी नुकतेच शिवरायांचे गुरू रामदास स्वामी होते, असे वक्तव्य केले होते. त्यावर बरीच नाराजी निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री पवार यांनी नेमके या विषयाला हात घातला आणि घटनात्मक पदावरील महत्वाच्या व्यक्तीने महनीय व्यक्तींच्या विचारांचा आदर करावा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी आपल्या भाषणा दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची जाहीर तक्रार केल्याचे दिसून आले. मला पंतप्रधानांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायचे आहे, काही महत्वाच्या पदावर असलेले लोक महामानवाच्या संबंधी काही वाक्य बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक सावित्री बाई यांच्याबाबत काही वक्तव्य झाली आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या सहाय्याने समाजकार्य केले. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे, असे म्हणत अजित पवारांनी राज्यपालांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे.
(हेही वाचा पंतप्रधानांकडून शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, मेट्रोमध्ये बसून प्रवास…)
Join Our WhatsApp Community