गोरेगाव परिसरातील वनराईमुळे मोठ्याप्रमाणात पक्ष्यांची किलबिलाट होत असून वेगवेळ्या प्रजातींचे पक्षी याठिकाणी येत असल्याने याठिकाणी आता पक्षी निरीक्षण केंद्र बनवले जाणार आहे. या पक्षी निरीक्षण केंद्रासह याठिकाणी विविध पक्ष्यांचे व झाडांची माहिती देणारे दालन तयार करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : दोन जकात नाक्यांच्या सल्लागारांवरच २० कोटींचा खर्च: या कामांसाठी नेमले सल्लागार )
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जानेवारी २०२१ मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विभागाच्या सहायक आयुक्तांना पदपथ, उड्डाणपूल, भिंती, स्वच्छता गृह तसेच वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांनी सौंदर्यीकरणाच्या दृष्टीकोनातून विविध कामे हाती घेतली आहे. त्यानुसार गोरेगावमधील प्रभाग क्रमांक ५० मध्ये पक्षी निरिक्षण केंद्र बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पक्षी निरीक्षण केंद्रांसह पदपथांचे सौंदर्यीकरण करणे, पक्षी निरीक्षण केंद्र बनवणे, विविध पक्षांचे व झाडांचे माहिती देणारे दालन तयार करण्यास लगतच्या भिंतीवर रंगकाम करण्यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली हाती. यामध्ये पक्षी निरिक्षण केंद्राच्या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये भव्या कन्स्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला ९६ लाख ५८ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
गोरेगावमधील पद्मावती मार्गाचे सौंदर्यीकरण
गोरेगावमधील प्रभाग क्रमांक ५१ मधील पद्मावती पदपथांच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात येत असून यासाठी ८८ लाखांचा खर्च येणार आहे. या कामांसाठी एच.एल.पी. एंटरप्रायझेस या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community