ओमायक्रॉनचा पसारा आटोक्यात आलेला असताना रविवारी मार्चच्या दुस-या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात रविवारी केवळ कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाच्या तिस-या लाटेतील ही नीच्चांकी नोंद आहे. राज्यात आता ३ हजार ७०९ कोरोनाच्या रुग्णांवर विविध भागांत उपचार सुरु आहेत.
राज्यात ३६३ नवे कोरोना रुग्ण तपासणीअंती
रविवारची कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंदही नीच्चांकी ठरली. राज्यात ३६३ नवे कोरोना रुग्ण तपासणीअंती आढळल्याचे आरोग्यविभागाने जाहीर केले. त्यापैकी ६१ रुग्णांचा जनुकीय तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. पुणे मनपा ४४, पिंपरी-चिंचवडमध्ये ८, तर पुणे ग्रामीण भागांत ९ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. या सर्व रुग्णांच्या जनुकीय चाचणीचा अहवाल बी जे वैद्यकीय महाविद्यालयाने दिला. राज्यात रविवारी ६८८ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला.
(हेही वाचा कळंबोलीत जीएसटी घोटाळा, रक्कम वाचून व्हालं थक्क)
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९८.०८ टक्के
- राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के
- रविवारी राज्यात मुंबई, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडला प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.
- राज्यात आतापर्यंत दिसून आलेल्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या – ५ हजार ७२६
- राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ४ हजार ७३३