मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे हे एक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबईत वाहने टोइंग करणे थांबविण्याची योजना प्रायोगिकदृष्ट्या सुरुवात केल्यानंतर आयुक्तांनी जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जेष्ठ नागरिकांच्या घरी आठवड्यातून दोन वेळा पोलिसांनी भेटी देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहे. या भेटीची नोंद वहीत करून प्रत्येक महिन्याचा अहवाल आयुक्त स्वतः बघणार आहे.
आठवड्यातून दोन वेळा भेटी देणार!
ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योजना लागू करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. मुंबईत एकटे राहणा-या जेष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन आठवड्यातून दोन वेळा त्यांना भेटी द्या! त्यांच्या समस्या काय आहे, त्या जाणून त्या तात्काळ दूर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त पांडे यांनी दिले आहे. संजय पांडे यांनी पोलीस ठाण्याला दिलेल्या सूचनेत जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काय करायचे याबाबत मार्गदर्शन केले आहे.
(हेही वाचा फडणवीसांच्या कार्यक्रमापूर्वीच भाजप-मविआचे कार्यकर्ते आमने-सामने)
अशी राबविण्यात येणार योजना
- बीट अधिकाऱ्याने त्याच्या बीटमधील सर्व ज्येष्ठ नागरिकांची यादी मिळवावी
- त्यांनी ही यादी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना द्यावी. त्यापैकी (बीट अधिकारी) यांनी जेष्ठ नागरिकांना नोटबुकचे वाटप करावे.
- बीट कॉन्स्टेबलने आठवड्यातून किमान दोनदा भेट देऊन त्या नोटबुकवर आपली स्वाक्षरी करावी.
- दर आठवड्याला बीट अधिकारी यांनी भेट देऊन तपासणी करावी व सदरील नोटबुक मध्ये स्वाक्षरी करावी.
- बिट पोलीस निरीक्षक दर दिवसांतून एकदा पर्यवेक्षण करेल आणि अधिकारी व अंमलदार यांनी भेट दिली आहे का त्याची तपासणी करेल.
- महिनाअखेरीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सर्व बीटच्या डायरीची तपासणी करावी, बिट अधिकारी व अंमलदार गस्ती बाबत नोंद घ्यावी.
आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावे
मुंबई शहर पोलीस घटकात सर्व अधिकारी व अमलदारांनी याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी तसेच याबाबतचा लेखी आदेशाचा आम्ही पाठपुरावा करू अशी सूचना पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आदेशात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community