माहुल पंपिग स्टेशनच्या कामाला मुहूर्त सापडला: कंत्राटदाराचीही केली निवड

146

मुंबईत पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर मात करण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार बनवण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनपैकी दोन पंपिंग स्टेशनची कामे रखडली आहे. यातील मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशनच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आल्यांनतर आता माहुल पंपिंग स्टेशनच्या जागेचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर या पंपिंग स्टेशनचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत असून यासाठी पंपिंग स्टेशन करता ४६० कोटी रुपये आणि विविध करांसह ५४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा २४ टक्के अधिक दराने हे काम मिळवण्यात आले आहे.

(हेही वाचा राणेंवरील कारवाईवरून शेलारांचा हल्लाबोल! काय म्हणाले?)

५४६ कोटी रुपये खर्च केले

मुंबईमध्ये यापूर्वी हाजी अली, इर्ला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड बंदर, ब्रिटानिया आणि खारमधील गझधरबंध या सहा पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली आहे. परंतु माहुल आणि मोगरा पंपिंग स्टेशनची कामे मागील १५ वर्षांपासून रखडलेली आहेत. माहुल पंपिंग स्टेशनच्या जागेचा तिढा कायम होता. मिठागराची जागा ताब्यात न आल्याने महापालिकेने खासगी विकासकाच्या ताब्यातील जमिनीची अदलाबदल करण्यात आली. याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या जमिनीची अदलाबदल करत खासगी विकासकाला लाभ दिल्यामुळे भाजपने सत्ताधारी शिवसेनेवर तसेच प्रशासनावर आरोप केले होते. परंतु ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असतानाच याबाबतची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मागवलेल्या निविदेमध्ये संयुक्त भागीदारीतील तीन कंपन्यांनी भाग घेतला. यामध्ये मेसर्स लक्ष्मी-अविघ्न-विलो ही कंपनी पात्र ठरली आहे.  हे काम पावसाळा वगळून ३० महिन्यांमध्ये केले जाणार आहे. यासाठी ४६० कोटी रुपये आणि विविध करांसह ५४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

या भागातील पाणी तुंबण्याची संपणार समस्या

 कुर्ला नेहरु नगर, टिळक नगर, किंग सर्कल,  कलेक्टर कॉलनी, सिंधी कॉलनी, शीव आदी भागांमध्ये निर्माण होणाऱ्या पूरसदृश्यस्थितीवर मात करता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.