राज्य पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच 38 हजार 169 पोलीस नायक शिपायांना पदोन्नती देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या नव्या पदोन्नती आदेशामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पदोन्नती दिली जाणार आहे.
अशी तरतूद केली आहे
राज्य पोलीस दलात जवळपास 1 लाख 97 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. गृह मंत्रालयाकडून नवीन पदोन्नती अधिकारी आणि कर्मचारी आहेत. गृह मंत्रालयाकडून नवीन पदोन्नती योजना लागू करण्यात आली असून, राज्यातील प्रत्येक कर्माचा-याला पोलीस अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त होता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.
( हेही वाचा: महापालिका स्थायी समितीच्या शेवटच्या सभेपुढे सुमारे सहा हजार कोटींचे ३७० प्रस्ताव!)
म्हणून थेट पोलीस हवालदार
गृह मंत्रालयाने पदोन्नतीसाठी पुनर्रचना केल्याने, जवळपास 51 हजार पोलिसांना लाभ होणार आहे. पुनर्रचनेनंतर पोलीस शिपायांची पदे 1 लाख 8 हजार 58 पोलीस हवालदारांची पदे 51 हजार 210, सहायक पोलीस उपनिरीक्षकांची पदे 17 हजार 71 इतकी वाढवण्यात आला आहे. नव्या पदोन्नती संरचनेनुसार आता दहा वर्षांत थेट पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. याचा लाभ राज्यातील 38 हजार 169 पोलीस नाईक शिपायांना होणार आहे. नागपूर शहर पोलीस दलात 1 हजार 776 पोलीस नायक शिपाई आहेत. गृह मंत्रालयाच्या नव्या पदोन्नती आदेशाने आता ते सर्व कर्मचारी थेट पोलीस हवालदार होणार आहेत.
Join Our WhatsApp Community