दाऊदसाठी मनी लाॅंडरींग केल्याच्या गंभीर आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातही विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत, मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
…नाहीतर तीव्र आंदोलन
23 फेब्रुवारीला सकाळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री यांच्या कुर्ला स्थित घरी ईडी दाखल झाली आणि झाडाझडती नंतर मलिकांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. तब्बल 8 तास झालेल्या चौकशीनंतर ईडीने मलिकांना अटक केली. त्यानंतर भाजपाने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिकांचा राजीनामा घ्या, नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने राज्य सरकारला दिला आहे.
( हेही वाचा: नवाब मलिक गर्दुल्ले आहेत! मोहित कंबोजांनी दाव्यासह केला आरोप )
काय आहे नेमके प्रकरण?
- 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल यांचे नवाब मलिकांशी व्यवसायिक संबंध.
- नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी करोडोची जमीन कवडीमोल भावाने विकली.
- कुर्ला येथील एलबीएस रोडला असलेल्या गोवा कंपाऊंड येथील करोडोची साडे तीन एकर जमीन 20 ते 30 लाखात मलिकांच्या नातेवाईकांना दिली.
- दाऊदनंतर हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होत्या आणि त्यामधे पावर ऑफ अटरनी सलीम पटेल यांना लावत होत्या. तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली.