जेजे रुग्णालय आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांनी सध्या ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ड्रग टेस्ट करावी आणि त्यांचा अहवाल जगजाहीर व्हावा, कारण हेच मलिक याआधी ड्रग माफियांचा प्रवक्ता म्हणून समोर आले होते. यामागील खरे कारण हेच आहे की, नवाब मलिक हे गर्दुल्ले आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे माजी युवा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
नवाब मलिक गर्दुला है – मोहित कंबोज @mohitbharatiya_ @nawabmalikncp pic.twitter.com/oF8tfu4svN
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 7, 2022
मलिक खोटे कारण देत रुग्णालयात दाखल
त्याप्रमाणे तसा व्हिडिओ कंबोज यांनी सोशल मीडियातून व्हायरल केला आहे. मिया नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे, ‘हम झुकेंगे नही, पर पिटेंगे जरूर’ आणि खोटे कारण देत ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. कुणी म्हणते की, मलिक यांच्या मूत्रामधून रक्त येत आहे,. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय आणि खूप घाबरले आहेत, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा ‘एसटी’ला नफ्यात आणण्यासाठी काय आहे नियोजन? जाणून घ्या…)
मलिक रोज गांजा पितात
नवाब मलिक यांना अटक होण्याच्या एक दिवस आधी ते बलियावरून मुंबईत आले होते. सकाळी ते घरी होते जेव्हा त्यांना ईडीने ताब्यात घेतले होते. तेव्हापासून ते रुग्णालयात पोहोचेपर्यंत नवाब मलिक हर्बल तंबाखूचे सेवन करत होते, गांजाचे सेवन केल्याशिवाय नवाब मलिक यांना झोप लागत नाही. नवाब मलिक रोज गांजा पितात, असाही आरोप कंबोज यांनी केला. गांजा न मिळाल्याने जी तडफड होते, हे सर्व त्यासंबंधीचे लक्षणे दिसून येतात. त्यातून ते घाबरले आणि ते रुग्णालयात पोहचले, असेही मोहित कंबोज म्हणाले.
Join Our WhatsApp Community